मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे – चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पाटील विविध मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी विधानसभेच्या पर्वती मतदारसंघातील मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली.