मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

3
पुणे : लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील बाणेरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, मोदीजींनी दहा वर्षात सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. या योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे आज देश मोदीजींवर भरभरून प्रेम करत आहे. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन या वेळी पाटील यांनी केले.
यावेळी राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धिरज घाटे, आमदार जगदिश मुळीक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, गणेश ३बिडकर, पुनित जोशी, सर्व भाजपा नगरसेवक व पदाधिकारी तसेच बाणेर-बालेवाडी-पाषाण-औंध-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी याठिकाणचे शेकडो नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.