पुणे: आज भगवान परशुराम महाराज आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती. यानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी भगवान परशुराम महाराज आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
चंद्रकांत पाटील यांनी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील बाजीराव रोड परिसरातील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, सर्वांना बसवेश्वर महाराज जयंतीनिम्मित शुभेच्छाही दिल्या.