जन जन करे पुकार,अबकी बार 400 पार! – चंद्रकांत पाटील

20
पुणे : आज लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कॅन्टोन्मेंट येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदयात्रा घेण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.
या वेळी चंद्रकांत पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी १० वर्षांत केलेल्या कार्यावर प्रकाश टाकून आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहनही केले.
यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे , मतदारसंघाचे आमदार सुनीलभाऊ कांबळे, आरपीआयचे संजय सोनवणे, शिवसेनेचे अजय भोसले, नीलेश आल्हाट, विवेक यादव, अतुल गायकवाड, भाजपा दक्षिण भारतीय आघाडीचे राजू श्रीगिरी, प्रियांका श्रीगिरी, . प्रवीण जाधव, सचिन यादव, संतोष इंदुलकर, ईश्वर कांकारिया, किशोर सांघवी, मेघराज पवार, सचिन मथुरावाला, सोमेश कांबळे, भगवान गायकवाड, महेंद्र भोज यांच्यासह मतदासंघांतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.