पुणे : लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, केवळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांचीच नव्हे, तर राजसाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या असंख्य पुणेकरांची या सभेला गर्दी होती. पाटील म्हणाले कि राज ठाकरे असे नेतृत्व आहे कि त्यांना हवं ते मांडत असतात. कोणला बरं वाटेल म्हणून नाही. आज मोदीजी तिसर्यांदा पंतप्रधान होण्यामध्ये देश मजबूत होणार आहे, त्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. आजची ही सभा म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची जणू नांदीच ठरली, असे पाटील म्हणाले.
राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले अरे, फतवे कसले काढता? आम्ही फतवे काढले तर फार जड जाईल,’ असा सज्जड दम भरीत राजसाहेबांनी विरोधकांना आपल्या नेहमीच्या शैलीतील भाषणातून घाम फोडला. ‘काही चांगल्या कामांसाठी मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे. पुण्यातही मुरलीधरजी महापौर असतानाच्या काळात काही चांगली कामं झाली आहेत. मात्र, आपल्याला पुण्याला आणखी समृद्ध बनवायचं आहे. त्यासाठी अनेक कामं केंद्रातून खेचून आणावी लागतील. ती जबाबदारी आता त्यांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे,’ असं आवाहन करतानाच, ‘घ्या आता मी फतवा काढतो. पुण्याच्या विकासासाठी तुमच्या मतांचं मोहोळ उठवा, म्हणजे मुरलीधर मोहोळ बहुमताने लोकसभेत जातील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ख. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, आ. माधुरी मिसाळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर यांसोबत महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.