मोदीजी ज्यावेळी ४०० पार करतील तेव्हा आपण आश्वस्त होऊ कि देशामध्ये एक खंबीर सरकार आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

8

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज संध्याकाळी सांगता होते आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा शनिवारी सकाळी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर झाली. या सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, गेला दीड महिना वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार सुरु आहे, आज शेवटचा दिवस आहे. काल राज ठाकरे यांची सभा झाली आज गडकरी यांची सभा आहे. पावसामुळे या दोन्ही सभा रद्द झाल्या असत्या. पण राज ठाकरे म्हणाले समोर ५ माणसं असली तरी मी भाषणं करणार. नितीन गडकरी यांनी देखील असच उत्तर दिलं, हे वैशिष्ट्य या नेत्यांचं आहे . नितीन गडकरी यांनी रस्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलं. एकूणच देशाचा पायाभूत विकास करण्यामध्ये त्यांना जी व्हिजन आहे ती कधी कधी चकित करणारी ठरते. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या ठिकणी उपस्थित आहोत. मोदीजी ज्यावेळी ४०० पार करतील तेव्हा आपणं आश्वस्त होऊ कि देशामध्ये एक खंबीर सरकार आहे. त्यामुळे आपण मागील अनेक दिवस सातत्याने प्रचार करत आहोत, असे पाटील म्हणाले.
देशातील रस्ते बांधणीमध्ये गडकरी यांनी दिलेले योगदान हे कोणीच विसरू शकणार नाही. देशाच्या विविध भागात चांगल्या दर्जाचे रस्ते कमी वेळेत तयार झाले ते केवळ गडकरी जी यांच्या दूरदृष्टिकोनामुळे. आजच्या सभेतही त्यांनी मोदी सरकारच्या काळात देशात रस्ते कसे निर्माण केले गेले, याबद्दल माहिती दिली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सभेला खासदार मेधाताई कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  दीपक मानकर, हेमंत रासने, रुपालीताई पाटील, किरण साळी,  मंदार जोशी, गणेश भोकरे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.