पुणे : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील महेश विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले कि, रांगेत इतर मतदारांसोबत उभं राहून मतदान करताना खूप आनंद झाला. साधारण ७०० केंद्र आहेत आणि जवळपास २१०० बूथ आहेत. सर्वत्र उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर सर्वाधिक मेजॉरीटीने सरकार स्थापन केलं तर देशमध्येच नाही तर जगामध्ये मेसेज जाईल कि हे खूप मजबूत सरकार आहे. मजबूत सरकारचे फायदे लोकांनी दहा वर्ष अनुभवलं आहे. गेल्या दहा वर्षात देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही किंवा एकही दंगल झाली नाही. त्यामुळे मजबूत सरकार आवश्यक असतं ,त्यासाठी लोक मतदान करणार आहेत.
सकाळीच पुणेकर मतदारांची केंद्रावर झालेली गर्दी सुखावणारी होती. मतदान फक्त हक्कच नाही, तर लोकशाहीतले आपले पवित्र कर्तव्यही आहे! सुज्ञ पुणेकरांनी मतदान केंद्रावर केलेली गर्दी लोकशाहीला बळ देणारीच! पुणे आणि आज मतदान होत असलेल्या अन्य सर्व मतदारसंघांतील मतदारांनाही आपले पवित्र कर्तव्य बजवा, मतदान कराच, असे नम्र आवाहन पाटील यांनी केले.
Get real time updates directly on you device, subscribe now.