आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या एका कृतिशील व्यक्तीमत्वास आपण मुकलो – चंद्रकांत पाटील
मुंबई : विधानसभेच्या करवीर मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत क्लेशदायक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.