दिवंगत वसंतराव मालधुरे यांचे कार्य समस्त शिक्षक वर्गाला आदर्श ठरणारे – चंद्रकांत पाटील

16

अमरावती : अमरावतीचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते वसंतराव मालधुरे यांचे नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिवंगत माजी आमदार, ज्येष्ठ नेते वसंतराव मालधुरे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषदेचे ग्रामीण भागातील शाखा कार्यवाह ते सरकार्यवाह पदापर्यंत त्यांचा कार्यकाळ अतिशय कृतिशील आहे. या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांचे सामूहिक व वैयक्तिक समस्यांचे निराकरण करून एक आदर्श शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. शिक्षक परिषदेचा विस्तार राज्यस्तरावर व्हावा यासाठी त्यांचेही योगदान लाभले आणि यातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अखंड महाराष्ट्रात उभारली गेली ही बाब उल्लेखनीय आहे.

दिवंगत वसंतराव मालधुरे यांचे कार्य समस्त शिक्षक वर्गाला आदर्श ठरणारे आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती प्रदान करो! ॐ शांती! अशा शब्दता पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.