उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा यंदाचा वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित… ६५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प

35

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला यंदाचा वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला आहे. १० रोजी चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस. यंदा आपल्या ६५ व्या वाढदिवशी पाटील यांनी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात ६५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. या संकल्पात सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन देखील यानिमित्ताने पाटील यांनी केले.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची संख्या आई टेकड्या यांची महत्वाची भूमिका बजावतात. याच गोष्टीचा विचार करून चंद्रकांत पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे आपला यंदाचा १० जून रोजीचा वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला आहे. पाटील आपल्या वाढदिवशी नेहमीच सामाजिक कार्यासाठी समर्पित करतात. दिनांक ९ जून रोजी सकाळी ७ वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुणेकरांचे उद्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.
पुणे, कोल्हापूर , सोलापूर, अमरावती या जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात एकूण ६५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. कोथरूड मधील महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर पहिल्या टप्प्यात औषधी वनस्पती तसेच महत्वाचे वृक्ष लावण्यात येणार आहेत. यासाठी वन विभागाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.