पंढरपूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांनी विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडलेल्या पुरातन वस्तूंची पाहणी देखील केली.
क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामादरम्यान हनुमान दरवाजाजवळील तळघरात काही पुरातन मूर्ती तसंच जुनी नाणी सापडली. शेकडो वर्षानंतर सापडलेल्या ह्या पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन मंदिराचा दाखलाच आहेत. विठ्ठल मंदिरात सापडलेल्या या पुरातन वस्तूंची आज चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून त्याबाबत माहिती घेतली.
पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात संनवर्धनाचे काम सुरु असताना एक तळघर सापडले आहे. आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु आहे.
Get real time updates directly on you device, subscribe now.