राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला उत्तम मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळाव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही – चंद्रकांत पाटील

19
पुणे :  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा क्षीण घालवण्यासाठी तसेच पुण्याच्या राजकीय संस्कृतीच्या उत्तम स्वास्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाऊंडेशन आयोजित कै. डी. ब. देवधर स्मरणार्थ ‘मैत्री बॉक्स प्रिमियर क्रिकेट लीग- २०२४’ च्या मनसे विरुद्ध शिवसेना उबाठा आणि महिलांच्या दामिनी विरुद्ध हिरकणी संघ अशा पार पडलेल्या सामन्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.
आपल्या दैनंदिन जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. खेळ हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण अंग असून खेळांमुळे शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला उत्तम मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळाव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही, असेही ते म्हणाले. यासाठीच हा सामान आयोजित करण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात आला. यावेळी पाटील यांनी विजेत्या संघासह आयोजक ॲड.मंदार जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.