भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय… विकासाच्या वचनपूर्तीच्या दिशेने लोकसभा निवडणुकीतील हा विजय हे ठाम पाऊल आहे -चंद्रकांत पाटील

32
पुणे : लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे. या विजयाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोहोळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल सर्वप्रथम मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुण्याच्या विकासाचे वचन आम्ही दिलेले आहेत, त्या वचनपूर्तीच्या दिशेने लोकसभा निवडणुकीतील हा विजय हे ठाम पाऊल आहे. विकासाला हातभार लावताना जनतेच्या कल्याणासाठी, त्यांचे प्रश्न आग्रहाने सोडवण्यासाठी नवनिर्वाचित खासदार मोहोळ आणि आम्ही सगळेच अविरत कार्यरत राहूच, असे पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांच्या प्रचारासाठी अखंड मेहनत घेणारे भाजपा आणि महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांचे देखील आभार मानले. तसेच आम्हाला विजय मिळवून देणाऱ्या मतदारांचेही आभार. आपण दाखवलेला विश्वास कायम राखण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू, असे पाटील यांनी म्हटले.
पुण्यात मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे एक चुरस निर्माण झाली होती. वंचित बहुजन आघाडीनेही माजी नगरसेवक वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने म्हंणजेच एमआयएमने माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पुण्यात चौरंगी लढत होती. ८६३६९ मताधिक्याने मोहोळ विजयी झाले आहेत. ४१५५४३ मत मिळवून मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.