पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत पुणे मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा दणदणीत विजय झाला. या विजयानंतर पुण्यात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या जल्लोषात सहभाग घेत विजयाचा गुलाल उधळून आनंद साजरा केला. दरम्यान, लोकसभा निवडणूकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन केले.
पुण्याच्या विकासात हातभार लावताना जनतेच्या कल्याणासाठी, त्यांचे प्रश्न आग्रहाने सोडवण्यासाठी मोहोळ अविरतपणे कार्यरत राहतील, असा ठाम विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांच्या प्रचारासाठी अखंड कार्यरत राहिलेले भाजपाचे आणि महायुतीचे सर्व नेते, महायुतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचे पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच, या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या मायबाप मतदारांचे देखील पाटील यांनी मनापासून आभारही व्यक्त केले.
या जल्लोषानंतर चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना घवघवीत यश मिळाले म्हणून शंकर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी ते लीन झाले.
Get real time updates directly on you device, subscribe now.