यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

53
पुणे : दि. १० जून २०२४ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस. या वाढिवसानिमित्त वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात ६५ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प पाटील यांनी केला आहे. या संकल्पाचा शुभारंभ ९ जून २०२४ रोजी, सकाळी ६.३० वाजता कोथरूडमधील म्हातोबा टेकडीपासून होईल. या संकल्पास पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, महाराष्ट्राला हरित करण्यात योगदान द्यावे, असे विनम्र आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे कि, वेगवेगळ्या कारणांनी होणारी प्रचंड वृक्षतोड आणि त्या प्रमाणामध्ये नवीन वृक्ष, नवीन झाड न लागणं, यातून निसर्गचित्र पूर्णपणे बिघडलं. यावेळच्या प्रचंड उन्हाळ्यामुळे अनेक गेलेले जीव आपण सगळ्यांनी अनुभवलं. आपण आपापल्यापरीने झाड लावण्याचा, झाड जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझा वाढदिवस मी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतो. यावेळी संपूर्ण महराष्ट्रात ६५ हजार झाड लावण्याचा मी संकल्प करत आहे. सुदैवाने माझ्याकडे उच्च शिक्षण विभाग, वस्त्रोद्योग विभाग यासंबंधित सगळ्यांना आवाहन करत वर्षभरामध्ये ६५ हजार झाड लावण्याचा माझा संकल्प असल्याचे पाटील म्हणाले.
या उपक्रमाची सुरुवात ९ जून रोजी सकाळी ६. ३० वाजता पुण्यातील कोथरूड मधील म्हातोबा टेकडीपासून होईल. आपण यामध्ये सहभागी व्हावं असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. यात सगळ्या प्रकरची मदत, सगळ्या प्रकारचं सहकार्य मी करणार आहे , पण झाड लावणं आणि ती पुढे वाढवणं हि आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.