अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरीजी यांचा चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान

9

पुणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि कोहिनूर ग्रुपच्या माध्यमातून श्रीक्षेत्र अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष पूजनीय स्वामी गोविंदगिरीजी यांना गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा वृतस्थ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पत्रकार संघाने समाजातील काही रत्न शोधून आणली आणि त्यांना सन्मानित केले. हे तिसरं वर्ष आहे. ते असं व्यक्तिमत्व शोधत आहेत ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आज संपूर्ण देशात स्वामीजींनी आध्यत्मिक क्षेत्रात स्वतःच एक स्थान निर्माण केलं. अयोध्या राम मंदिरासाठी भरपूर निधी त्यांनी गोळा केला. गीतेचा प्रसार करण्यासाठी जगभर प्रवास करणारे, यासोबतच ऑनलाईन गीतेचा अभ्यास ते करून घेत असल्याची माहिती या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लोकमत समुहाचे विजय दर्डाजी, पुढारी समुहाचे योगेशजी जाधव, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमारजी गोयल, उद्योजक संजय मालपाणीजी, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, अध्यक्ष किरण जोशी, प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्यासह इतर मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.