मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आषाढी वारी नियोजन बैठक संपन्न

38

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत वारी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यासहीत, स्वच्छता राखणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे पाटील म्हणाले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाइन, प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी, फडांचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, पंढरपूर संस्थानचे गहिनीमहाराज औसेकर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.