पुणे शहर भाजप वैद्यकीय आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप

27

पुणे :  भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे शहराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, शाळेचे नूतन वर्ष सुरू झाले की बाल मित्रांना ओढ लागते ती शाळेच्या वस्तूंची. यात सर्वात महत्त्वाची अणि बालकांच्या आवडीची वस्तू म्हणजे बॅग! भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे शहराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटले, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, पुणे महानगरपालिका सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.