चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष मुलांच्या पुनर्वसन केंद्रातील मुलांची ने आण करण्याकरीता उपलब्ध करण्यात आलेल्या बस सेवेचे लोकार्पण
पुणे : प्रा फाउंडेशन संचालित विशेष मुलांच्या पुनर्वसन केंद्रातील विशेष मुलांची ने आण करणे सुलभ व्हावे व त्यांना त्यांच्या व्हील चेअरसह मोठ्या वाहनात बसता यावे यासाठी सी.एस.आर निधीतून वाहन उपलब्ध करून देण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या बस सेवेचे लोकार्पण करण्यात आले.