पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चाकडून नाना पटोलेंच्या निषेधार्थ निदर्शने

465

पिंपरी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्याने भाजपने काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या कृत्याचा निषेध करत राज्यभरात निदर्शने केली आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी येथील आंबेडकर चौक येथे देखील पिंपरी चिंचवड भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने केली गेली आणि निषेध देखील करण्यात आला.

काँग्रेसी इंग्रज मानसिकतेचं दर्शन त्यानिमित्ताने झालं म्हणत एकीकडे भारत भारत जोडो चे नारे लावायचे आणि दुसरीकडे मात्र कार्यकर्त्याला हीन वागणूक द्यायची हे काँग्रेसी धोरण नवं भारतात चालू दिलं जाणार नाही. इंग्रजांसारखी विकृत मानसिकता असणाऱ्या नाना पटोले यांचा जाहीर निषेध; अशा शब्दात युवामोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी शहर युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यक्रते उपस्थित होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अजितजी कुलथे, शिवम डांगे, सचिन बंदी, उमेश सांडभोर, अभिजीत बागुल, मुन्ना कुरेशी, पंकज ठाकुर, तेजस फाळके, निरंजन राऊत, मोहन राऊत, आदित्य रेवतकर, कपिल जाट, गणेश संभेराव, राहुल खाडे, आदम मुलानी, धनंजय भापकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.