चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरुडमधील वस्ती भागातील लेकींचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी “मानसी” नावाच्या एका अभिनव उपक्रमाची आजपासून सुरुवात

44

पुणे, २१ जून : आज आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक दशक पूर्ण होत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दहा वर्षापूर्वी २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा व्हावा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मांडला. या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होऊ लागला. या योग्य दिनाचे औचित्य साधून आजपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये “मानसी” नावाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आंतरराष्ट्रीय योग दिवस आजही संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आजपासून कोथरुडमध्ये “मानसी” नावाने एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोथरुडमधील वस्ती भागातील लेकींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी केळेवाडी येथे मोफत योग शिबीर आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी, पौष्टिक आहार, औषधोपचार, वैद्यकीय सल्ला, दंतचिकित्सा अशा विविध उपक्रमांचा यात समावेश आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात ५० मुलींनी यात सहभाग घेतला असून टप्प्याने इतरही भागांमध्ये हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
मुलींचे आरोग्य, मन, व्यक्तिमत्व, सौंदर्य यांची काळजी घेणारा हा उपक्रम आहे. यामध्ये मुलींची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यांना पौष्टिक आहार पुरविला जाईल. योग- ध्यान वर्ग घेतला जाईल. दर महिन्याला सॅनिटरी पॅड्स दिले जातील. ब्युटी पार्लर ची प्राथमिक सेवा पुरविली जाईल. दर सहा महिन्यांनी त्यांच्या दातांची तपासणी केली जाईल. यासोबतच मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन देखील या अभिनव उपक्रमातून केले जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.