योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

37

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यात आपल्या संस्कृती प्रतिष्ठान आणि पतंजली योग समितीतर्फे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , केंद्रीय मंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ तसेच भारत स्वाभिमान न्यासाचे बापू पडळकर यांनी सहभागी होत योगासन करून पुणेकरांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आणि प्रयत्नांनी सुरू झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून म्हणजेच गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा देताना, योग म्हणजे भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी असल्याचे सांगितले. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून, चेतना निर्माण करणे आणि आरोग्य सुधारण्यासाठी सर्वांनी योगासनांचा अंगिकार करावा. यंदा योगदिनाच्या माध्यमातून महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला आहे. महिलांचा सर्वांगीण विकास आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी काम करावे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

‘योगाभ्यास केल्याने केवळ शरिरालाच नव्हे, तर मनालाही आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने रोज योगासने करून संतुलित आणि निरोगी जीवनाचा अनुभव घ्यावा,’ असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी याप्रसंगी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.