श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित पुणे ते सिंहगड या भव्य पालखी सोहळ्यात चंद्रकांत पाटलांनी घेतला सहभाग

34

पुणे : विश्व हिंदू परिषद, पुणे यांच्या वतीने श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समितीच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे ते सिंहगड या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले. या भव्य पालखी सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन महाराजांना अभिवादन केले.

विश्व हिंदू परिषद, पुणे यांच्या वतीने श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती आयोजित श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या पुणे ते सिंहगड या भव्य पालखी सोहळ्यात आज चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी महाराजांना अभिवादन केले. तसेच, सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून विराट दुचाकी फेरीमध्ये शिवप्रेमी भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, धर्मवीर संभाजी महाराज कि जय, अशा घोषणांनी सिंहगडावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.