शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी भविष्यातल्या संधी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार महासंघ – पुणे शहराच्या वतीने आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजनन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी भविष्यातल्या संधी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे असे मत व्यक्त करून मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
याप्रसंगी पुणे शहराध्यक्ष किशोर कदम, महिला अध्यक्षा रेश्माताई केदारी, भाजपा नेते नवनाथ जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.