मुंबई : राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (एस.एल.बी.सी.) बैठकीस उपस्थित राहुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकांना सिबिल स्कोरची अट लावता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सोबतच सिबिल स्कोरची मागणी केल्यास बँकेविरुद्ध FIR करणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हित हीच महायुती सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँन्कर्स समितीची १६३ वि बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सिबिल स्कोअर बाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सिबिलची अट लागू करू नये, तसेच सिबीलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर खपवून घेणार नसल्याचे वक्तव्य केले. या सोबतच सिबिल स्कोरची मागणी केल्यास बँकेविरुद्ध FIR करणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला. FIR दाखल केल्यावर आमच्याकडे येऊ नका असंही फडणवीस म्हणाले.
एकूणच फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत बँकांना ऐकणं प्रकारची तंबीच दिली. यावरून महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.