अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यंगचित्राच्या माध्यमातून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

37

पुणे : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने, माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तरुण पिढीला ड्रग्स आणि अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी दीर्घकालीन, Together Against Drugs (TAD) ही व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संभाजी पार्क जंगली महाराज रस्ता येथे करण्यात आला. याप्रसंगी शहरातील कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थेचे व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन ‘अमली पदार्थांच्या विरोधात लढू या’ असा संदेश आपल्या प्रात्यक्षिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना योग्य संदेश देण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पाटील म्हणाले कि, सनी निम्हण यांनी केवळ भाषण , प्रबोधन असे न करता एक वेगळ्या पद्धतीने हा विषय व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडला आहे. हि चित्र एवढा करेक्ट मेसेज देत आहेत. म्हणजे जो व्यसनाच्या आहारी गेला नसेला तोही हे व्यंगचित्र पाहून म्हणेल कि या वाटेला जायला नको, असे पाटील यांनी म्हटले.
या मोहिमेत अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती, मार्गदर्शन, अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांसाठी व्यसनमुक्ती व औषधोपचार देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे अभियान एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून निरंतर सुरु राहणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.