दिव्यांग आणि उपेक्षित घटकांसाठी नि:स्वार्थी पणाने काम करणाऱ्या व्यक्तींच्या रचनात्मक कामात शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
पुणे : दीपस्तंभ – मनोबल फाऊंडेशनच्या दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षेत मिळविलेल्या प्रेरणादायी उत्तुंग यशासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी या उत्सवात सहभागी होऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय भावस्पर्शी होता. दिव्यांग आणि उपेक्षित घटकांसाठी समाजातील असंख्य व्यक्ती आजही नि:स्वार्थी पणाने काम करत आहेत. अशा सर्व व्यक्तींच्या रचनात्मक कामात शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
दीपस्तंभ या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना या कुटुंबाचा सदस्य करून मार्गदर्शन, मदत, दिशा दर्शन करण्याचा जो प्रयत्न केला जातो , त्यातून नंबरच जण IAS , IPS झालेत. MPSC परीक्षेत पास झालेत, बँकांच्या परीक्षेत पस आले आहेत त्यांच्या सन्मानाचा हा कार्यक्रम असल्याचे पाटील म्हणाले.
देशाचे अपंग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पंजाबचे IAS अधिकारी अजय अरोरा , अमित वाईकर यांसोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.