मुंबई : महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत आपले सरकार राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार असून पात्र लाभार्थी महिलांना दर महा १५०० रूपये देखील दिले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
योजनेचा लाभ अधिकाधिक माता भगिनींना घेता यावा यासाठी या योजनेसाठी आवश्यक पात्रता निकषांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सुधारीत निकषांनुसार आता २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा १,५०० रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरण्याची मुदत देखील ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या भगिनींना १ जुलै २०२४ पासूनच लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र महिला माता भगिनींनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, महायुती सरकार हे माता-भगिनींच्या कल्याणासाठी तत्पर असणारे सरकार आहे. याच कटिबध्दतेचा भाग म्हणून सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील माता-भगिनींना आर्थिक आधार मिळणार आहे. या निर्णयासाठी चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्रीमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Get real time updates directly on you device, subscribe now.