मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार…कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात विशेष मदत कक्ष

114

पुणे : राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली असून, कोथरुड मधील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. नामदार पाटील यांनी आपल्या कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला असून, कोथरुड मधील असंख्य महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नामदार पाटील यांच्या कोथरुड मधील कार्यालयात गर्दी केली आहे.

महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील सेतू आणि तहसील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली आहे. कोथरुड मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

नामदार पाटील यांनी आपल्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला असून, या कक्षाच्या माध्यमातून महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी आणि आवश्यक कागदत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत केली जात आहे. त्यामुळे कोथरुड मधील महिलांची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.