सोलापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका महा-ई-सेवा केंद्राला दिली भेट
सोलापूर : सोलापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका महा-ई-सेवा केंद्राला भेट दिली. या केंद्रावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूर शहरातील एका महा-ई-सेवा केंद्राला भेट दिली. यावेळी त्या केंद्रावर ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या प्रक्रियेची सविस्तर माहिती पाटील यांनी घेतली. तसेच ऑनलाइन अर्ज यशस्वीपणे अपलोड केलेल्या दोन महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात ऑनलाइन अर्जाची प्रत पाटील यांनी वितरितही केली.