सोलापूर : सोलापूर शहरातील रामवाडी येथे आई प्रतिष्ठानच्या वतीने ‘माझी लाडकी बहिण योजना’ या स्तुत्य निर्णयांचे स्वागत करण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य शासनाने माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहिण योजना घोषित करून स्वयंपूर्ण करण्याचे पाऊल उचलले आहे. तसेच, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उच्चशिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेऊन राज्यातील भगिनींच्या स्वप्नांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी पंखांत बळही दिले आहे.
या स्तुत्य निर्णयांचे स्वागत करण्यासाठी सोलापूर शहरातील रामवाडी येथे आई प्रतिष्ठानच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो महिलांनी महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मोठा जल्लोष केला. या जल्लोषात वरुणराजानेही सहभाग घेतला. मुसळधार पावसातही माता भगिनींचा उत्साह ऊर्जा देणारा होता. त्यांच्या या उत्साहाला मी शतशः वंदन करतो, असे पाटील यांनी म्हटले.
Get real time updates directly on you device, subscribe now.