चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथांचे   घेतले मनोभावे दर्शन

16
पुणे : ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्या वतीने पुण्यात दरवर्षी रथयात्रा आयोजित केली जाते.  पुण्यातील या रथ यात्रेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन भगवान जगन्नाथांचे मनोभावे दर्शन घेतले तसेच उपस्थित सर्व भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील याची माहिती दिली कि, हजारो भाविक पारंपरिक वेशात भगवान जगन्नाथांच्या जयघोषात या रथयात्रेत सहभागी होत असतात. आजही हा सोहळा पुण्यात त्याच जोशात साजरा होत असून हजारो भाविक यात सहभागी होत आहेत. या पवित्र दिनी पुण्यातील या रथ यात्रेत सहभागी होऊन पाटील यांनी भगवान जगन्नाथांचे मनोभावे दर्शन घेतले तसेच उपस्थित सर्व भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.