पुणे : कोथरुड मधील १००० रिक्षाचालकांना शिलाई सह गणवेश वाटप करण्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संकल्प केला असून त्याचा शुभारंभ रविवारी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, रिक्षाचालक आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने रिक्षाचालकांना उदरनिर्वाहासाठी खडतर परिश्रम करावे लागतात. रिक्षा चालविण्यासाठी गणवेश अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र, तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना गणवेशाच्या रुपाने मदत म्हणजे ‘मनी सेव्ह इज मनी अर्न्ड’ आहे. याच उद्देशाने पाटील यांनी कोथरुड मधील १००० रिक्षाचालकांना शिलाई सह गणवेश वाटप करण्याचा संकल्प केला असून त्याचा शुभारंभ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात झाला. दरम्यान, आगामी काळात कोथरूड मधील रिक्षाचालकांना रिक्षाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामातही मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष ॲड.गणेश वर्पे, कोथरुड मतदारसंघ समन्वयक गिरीश भेलके, रिक्षाचालक आघाडीचे अध्यक्ष सुनील मालुसरे, निवडणूक सह प्रमुख नवनाथ जाधव, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ.श्रद्धा प्रभूणे पाठक, नगरसेवक किरण दगडे पाटील, माजी स्विकृत नगरसेविका ॲड.मिताली सावळेकर, मंडल सरचिटणीस विठ्ठल बराटे, दीपक पवार, प्रभाग अध्यक्ष कैलास मोहोळ, प्रशांत हरसुले, विशाल रामदासी, बाळासाहेब टेमकर, ॲड.प्राची बगाटे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.