15 व्या कृषि नेतृत्व समितीचा 2024चा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त… महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट ठरणे विशेष आनंददायी बाब – चंद्रकांत पाटील

38
मुंबई : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षेबाबत महाराष्ट्राच्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषि नेतृत्व समितीचा 2024चा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट ठरणे विशेष आनंददायी बाब असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
 
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्वीकारला. 15 व्या कृषी नेतृत्व समितीच्या -2024 कॉनक्लव्ह् ॲग्रिकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषि नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषि राज्य म्हणून निवड केली आहे.
 
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी विकासाच्या विविध योजना आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले,  महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचं जनक राज्य आहे. महाराष्ट्राला हरित क्रांतीची समृद्ध परंपरा आहे आणि कृषी व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची गौरवशाली परंपरा देखील आहे. राज्याचे प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतो. महाराष्ट्र राज्याला कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याच्या रूपात निवडल्याबद्दल ‘एग्रीकल्चर टुडे’ आणि परीक्षक मंडळाचे आभार मानत, हा पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे. शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनत आणि मातीच्या प्रेमाचं ही फलश्रुती आहे. आमच्या शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ म्हणून मान दिला जातो आणि राज्य सरकारने त्यांच्या हितांसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.