मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दरवर्षी २५ जून “संविधान हत्या दिन” पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या म्हटले कि, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशावर आणीबाणी लादली. त्यांच्या सरकारने लाखो निरपराध देशवासीयांना बळजबरीने तुरुंगात डांबून लोकशाहीची क्रूर हत्या केली. त्या सर्व संघर्ष, योद्ध्यांचे स्मरण करून, मोदी सरकारने दरवर्षी २५ जून “संविधान हत्या दिन” पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस येणाऱ्या पिढ्यांना आणीबाणीचे अत्याचार आणि दडपशाहीच्या काळ्या अध्यायाची जाणीव करून देत राहील. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!, असे पाटील यांनी म्हटले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील एक पोस्ट करून माहिती दिली कि, २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकतेचे लाजिरवाणे प्रदर्शन करून देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला. भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण करेल., असं अमित शाह म्हणाले.
Get real time updates directly on you device, subscribe now.