केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वस्त्रोद्योग व्यावसायिकांबरोबर महत्वपूर्ण बैठक संपन्न

30

मुंबई : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे वस्त्रोद्योग व्यावसायिकांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सचिव विरेंद्रसिंह, रचना सहा, शोभा ठाकूर यांच्यासह वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी , वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या समवेत मान्यवरांशी संवाद साधला. दरम्यान, तीन हजार वर्षांपूर्वी भारताने वस्त्राद्योगाचे ज्ञान जगाला दिले. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी कापसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी यावेळी अधोरेखीत केले.

राज्यात वस्त्रोद्योग विकासाला मोठी संधी आहे. राज्याने सन २०२३- २०२८ या कालावधीसाठी वस्त्रोद्योगाला पूरक असे नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यात वीज सवलत, व्याज परतावा यासह विविध मुद्यांचा समावेश केला आहे. वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी व्याज परतावा योजनेचा लाभ घेतला पाहिजे. तसेच वस्त्रोद्योग कंपन्या देयकांचा निपटारा ४५ दिवसांत करण्याचे धोरण आहे. हा कालावधी ९० दिवसांचा करावा, अशी सूचना यावेळी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.