विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या पंकजाताई मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे या भाजपा उमेदवारांचे चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनात केले अभिनंदन

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली होती. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांकरिता १२ जुलै २०२४ रोजी मतदान व मतमोजणी करण्यात आली.
या निवडणुकीत श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे, योगेश कुंडलिक टिळेकर, डॉ.परिणय रमेश फुके, अमित गणपत गोरखे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, कृपाल हिराबाई बालाजी तुमाने, भावना पुंडलिकराव गवळी, शिवाजीराव यशवंत गर्जे, राजेश उत्तमराव विटेकर, सदाभाऊ रामचंद्र खोत आणि मिलिंद केशव नार्वेकर हे ११ सदस्य विजयी झाले आहेत, अशी घोषणा विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.जितेंद्र भोळे यांनी केली. या विजयानंतर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला.