कॅम्लिन उद्योगाचे साम्राज्य उभारणारे सुभाष दांडेकर यांच्या निधनामुळे मराठी उद्योगविश्वाला मानाचे स्थान मिळवून देणारे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हरपले – चंद्रकांत पाटील

29

मुंबई : कॅम्लिन उद्योग साम्राज्याचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योग समूहात आणि सामाजिक वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कॅम्लिन उद्योगाचे साम्राज्य उभारणारे ज्येष्ठ उद्योजक सुभाष दांडेकर यांच्या निधनामुळे मराठी उद्योगविश्वाला मानाचे स्थान मिळवून देणारे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती आणि दांडेकर कुटुंबाला या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो, हीच प्रार्थना.

कॅम्लिन हि एक देशातील आघाडीची कंपनी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारे सर्व साहित्य, असे कि, पेन्सिल, मार्कर, शाई, गणितीय उपकरणे, यासोबतच कार्यालयीन उपकरणे हा यांचा व्यवसाय. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्ष या कंपनीची धुरा सांभाळली. कॅम्लिन एक आंतरराष्ट्रीय ब्रँड करण्यात त्यांचा मोलाचा होता.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.