पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व युवा कौशल्य दिनानिमित्त भाजपा कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपा प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक यांच्या संयोजनातून नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सदर महोत्सव यशस्वीरित्या पार पडावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवामध्ये टाटा मोटर्स, बजाज, चितळे बंधू, डी मार्ट, यशस्वी प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, अल्ट्रोझ, हेल्थ केअर या सारख्या विविध क्षेत्रातील ७२ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होता. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक जबाबदारी, भान ठेवून समाजामध्ये वावरत असतो. कुणाल टिळक आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून दिवंगत मुक्ताताई टिळक यांचा वारसा पुढे नेण्यासाठी टिळक परिवार काम करत आहे.
या महोत्सवाला शैलेश टिळक, माजी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, आरतीताई कोंढरे, शहराचे सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर, पुनीत जोशी, राजेश येनपुरे, राजाभाऊ शेंडगे, कसबा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष प्रमोद कोंढरे, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ताभाऊ सागरे, श्रुतिका कुणाल टिळक हे सर्व उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.