पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सहाव्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सववाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आषाढी वारी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या वारकरी तथा शेतकरी बांधवांना या महोत्सवाचा नक्कीच लाभ होईल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी महोत्सवाचे आयोजक माजी आमदार प्रशांत परिचारक आणि जिल्हा कृषी अधिकारी आणि राज्यभरातून आलेले असंख्य शेतकरी उपस्थित होते.
पीएम किसान सन्मान निधीत ६ हजारांची भर घालून १२ हजार देणारे, १ रुपयात पीक विमा देणारे, एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत करणारे, सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती समजून मदत करणारे असे आपले सरकार आहे असे सांगून शेती आणि शेतकऱ्यांना जे जे आवश्यक आहे ते सरकार नक्की करेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
Get real time updates directly on you device, subscribe now.