भाजपाने मातंग समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला, याचे समाधान – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, (आर्टी)ची स्थापना करण्याबाबत शासनाचा अध्यादेश प्रसिद्ध झाला आहे. भाजपाने मातंग समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला, याचे समाधान असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
अनुसूचित जातीतील मातंग समाजाची ज्वलंत असलेली मागणी म्हणजेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला असूनन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आली होती. अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी क्रांतिगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत करण्यात आला होता. या आयोगाने शासनास ८२ शिफारशी केल्या होत्या.