केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ च्या अंतिम गुणवत्ता यादीत निवड झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : अलीकडेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. यात पुणे येथील सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रशिक्षित ४५ पैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे यात ४ मुलींचाही समावेश आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी यांच्या मार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यंपैकी २० विद्यार्थ्यांची यूपीएसीच्या अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. सारथी संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी या गटातील होतकरू विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील कोचिंग संस्थेत निशुल्क प्रशिक्षण संधी उपलब्ध करू दिली.