‘प्रत्येक महिन्यात किमान चार दिवस तरी अधिवेशन झाले पाहिजे’… सकाळ माध्यम समूहातर्फे पुण्यात आयोजित ‘अजेंडा महाराष्ट्राचा’ कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य
पुणे : सकाळ माध्यम समूहातर्फे आज पुण्यात आयोजित ‘अजेंडा महाराष्ट्राचा’ कार्यक्रमात सहभागी होऊन, राज्य सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग विभागांतर्गत घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दिली. तसेच, राज्य प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या वेळी काही उदयोन्मुख उद्योजकांचा गौरवही केला. प्रत्येक महिन्यात किमान चार दिवस तरी अधिवेशन झाले पाहिजे असे वक्तव्य यावेळी पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संवाद साधताना म्हटले की, विधिमंडळाची वर्षभरात तीन अधिवेशने होतात, त्यातील बराच काळ गोंधळात जातो. नव्या आमदारांना बोलण्याची संधी कमी मिळते. घाईघाईत निर्णय होतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सभागृहात गांभीर्याने वागले पाहिजे. राज्याच्या विकासावर चर्चा झाली पाहिजे त्यावर मंत्र्यांना उत्तर देता आले पाहिजे. यासाठी प्रत्येक महिन्यात किमान चार दिवस तरी अधिवेशन झाले पाहिजे असे मत चद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग विभागांतर्गत घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले 20217 पासून पारंपरिक उच्च शिक्षणाचे शुल्क माफ केले, तर व्यावसायिक शिक्षाणाचे शुल्क 50 टक्के माफ केले आहे. बीए, बीकॉम , बीएस्सी या पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येदेखील कौशल्य विकासासाठी अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. कौशल्य हे भविष्य असणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.