पुणे : पुणे ढोल-ताशा पथक महासंघाच्या वतीने शनिवारी कसबा गणपती मंदिरात ढोल-ताशा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आषाढी एकादशी संपन्न होताच, पुणेकरांना चाहुल लागते ती गणेशोत्सवाची आणि या उत्सवातील ढोल ताशांच्या गजराची! गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना लवकरच पुण्यात ढोल-ताशांचा निनाद घुमायला सुरुवात होणार आहे. याच अल्हाददायक वातावरणाची चाहूल म्हणून पुणे ढोल-ताशा पथक महासंघाच्या वतीने कसबा गणपती मंदिरात ढोल-ताशा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होऊन चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या