पुणे शहरातील व जिल्हयातील अतिवृष्टी होत असलेल्या तालुक्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी असल्याचे आजच आदेश निर्गमित करावेत, चंद्रकांत पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पुणे : पुणे शहरातील सर्व शाळांना व पुणे जिल्हयातील अतिवृष्टी होत असलेल्या तालुक्यातील शाळांना उद्या दि. २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी असल्याचे आजच आदेश निर्गमित करावेत व त्या आदेशाला प्रशासनामार्फत व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्वांना कळविण्यात यावे असे पत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना सादर केले.