नागरिकांनी सतर्क रहा, अत्यंत महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे कृपया टाळा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

46

पुणे : पुण्यात रात्रीपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पुणे आणि परिसरात बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साठले आहे. ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील स्वतः पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

पुण्यात पावसामुळे आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे.  या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघातील रजपूत वीट भट्टी, खिल्लारे वाडी येथील पूरग्रस्तांना चंद्रकांत पाटील याचं पुढाकाराने तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आम्ही उपलब्ध आहोत, असे पाटील यांनी म्हटले आहे. नागरिकांनाही नम्र विनंती आहे की, कृपया सतर्क रहा, अत्यंत महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे कृपया टाळा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी नदीपात्रात देखील उतरू नये, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. नदीपात्राजवळील साहित्य किंवा पशुधन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. सखल भागातील रहिवाशानी सतर्क रहावे. तसेच, आवश्यक खबरदारी घ्यावी. शहरातील पुढील ठिकाणी तातडीने दक्षता घेण्यात यावी. तसेच या ठिकाणी पुढील सूचना मिळेपर्यंत जाऊ नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
भिडे पूल
गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर
डेक्कनमधील शितळादेवी मंदिर
संगम पूल आणि पुलासमोरील वस्ती
कॉर्पोरेशनजवळील पूल
होळकर पूल परिसर
 
आपत्कालिन परिस्थितीत कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा –
पुणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा
020 25501269 / 020 25506800 / 020 67801500

Get real time updates directly on you device, subscribe now.