सगळ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल…पुण्यातील पूर परिस्थितीवर चंद्रकांत पाटील यांनी साधला पत्रकारांशी संवाद
पुणे : पुण्यात गुरुवारी पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. याबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, एका दिवसात जास्त प्रमाणात पाऊस पडला. हा असाधारण पाऊस आहे जो धरण क्षेत्रात जास्त प्रमाणात पडला. या पावसामुळे धरणं भरली कि, पाणी हे सोडायलाच लागत, नाहीतर धरण फुटण्याची शक्यता असते. हे पाणी नदीवाटे जात असताना नदीकाठच्या सगळ्या गावांना हा प्रॉब्लेम येतो, असे पाटील यांनी सांगितले.