कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता… नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से
मुंबई : एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमास १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित ‘माझा कट्टा’ विशेष मुलाखत सत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपली सहचारिणी अंजली पाटील यांच्यासमवेत उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी राजकारणातील अनेक किस्से सांगितले.
चंद्रकांत पाटील आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत सांगत असता म्हणाले कि, राजकारणात संबंधांपेक्षा माझ्यावरील विश्वास अधिक समर्पक शब्द वाटतो. तेरा वर्ष मी गुजरातमध्ये काम करत असताना १९८२ मध्ये अमित शाह यांचे नुकतेच राजकारणात पदार्पण झाले होते. त्यावेळी त्यांनी असा आग्रह धरला होता कि, विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडणारा हा जो कार्यकर्ता होता त्याला त्यावेळी एक पालक जोडला जातो. मी वेगवेगळ्या पालकांना जाऊन भेटायचो. यावेळी अमित शाह यांच्यासोबत माझी नेहमीच भेट व्हायची. नेहमी भेटून आमच्यात एक वेगळाच विश्वास तयार झाला होता. मला तेव्हा पदवीधरची पहिली सीट मिळाली होती.
पाटील पुढे सांगत होते, दरम्यान माझा मोदींसोबत संपर्क आला. १९७० – ७५ च्या आणीबाणीच्या काळात संचारबंदी होती. त्यावेळी संघाच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थी परिषदेचे काम करायला सांगितले होते. त्यावेळी गुजरातमध्ये मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात विद्यार्थी परिषदेने लीड केलं होते. त्यावेळी मोदींनी मला विद्यार्थी परिषदेचे काम करायला सांगितले होते. त्यावेळी मोदींशी नाळ अधिक जुळल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी पुण्यातील राजकारणाबाबत सांगत असताना म्हटले कि पुण्यातून मी लढावं हा पक्षाचा आदेश होता. पुणे ग्रामीण मध्ये ज्या सहकारी संस्था, वेगळ्या प्रकारच्या गावच्या राजकारणामध्ये आपण नाही आहोत. त्यामुळे पुण्यात जाऊन तू हे चांगल्या प्रकारे करू शकशील असे त्यांनी संगितले. माझी उच्च नव्हती. पण नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, असा किसा पाटील यांनी सांगितला.
मंत्रिपदाबाबत बोलत असताना पाटील म्हणाले, २०१४ साली रात्री अमित शाह यांचा मला फोन आला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यास सांगितले. मी पहाटे चार वाजता फडणवीस यांना भेटलो. त्यांनी कि सांगितले कि, आज शपथ घ्यायची आहे. मी उलट प्रश्न विचारला असता वरून आदेश आहे असे उत्तर त्यांनी दिले. त्यावेळी असा हा एकंदरीत प्रकार घडला त्यामुळे काही प्रशासकीय अनुभव नसताना केवळ विश्वास आणि त्यांच्या नजरेत मी कायम असल्यामुळे मला हि संधी मिळाली आणि कदाचित मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो असा अनुभव चंद्रकांत पाटील यांनी सांगितला.