चर्चगेट येथील तेलंग मेमोरियल मुलींचे वसतिगृह आणि मातोश्री मुलांचे शासकीय वसतिगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली भेट
मुंबई : मुंबईतील चर्चगेट येथील तेलंग मेमोरियल मुलींचे वसतिगृह आणि मातोश्री मुलांचे शासकीय वसतिगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट दिली. या वसतिगृहाच्या कामाची पाहणी करून उर्वरित राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी आज मुलींच्या वसतिगृहाची संपूर्ण पाहणी केली. मुलींच्या राहण्याची सोय पाहिली.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतली. तसेच उर्वरित राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्याच्या महत्वपूर्ण सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उच्च व तंत्र शिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक हरिभाऊ शिंदे, सहसंचालक प्रकाश बच्छाव, मातोश्री शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक डॉ. निलेश पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.