चंद्रकांत पाटील यांनी सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

69

पुणे : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सारसबाग येथील अण्णाभाऊंच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पाटील यांनी महापुरुष अभिवादन समितीच्या माध्यमातून आयोजित एकता मिसळचे वाटप करुन आस्वाद घेतला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष अभिवादन कृती समिती यांच्या वतीने भव्य एकता मिसळ स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मिसळ तयार करण्याचा आणि मिसळ खाण्याचा आनंद लुटला.

स्वराज्यातून सुराज्याचा मूलमंत्र देणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची देखील आज पुण्यतिथी. यानिमित्त आज पुण्यातील केसरी वाडा येथे टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाटील यांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी हेमंत रासने, राजेंद्र काकडे, कुणाल टिळक तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.